बांगलादेशात बॉम्बसह पकडलेल्या कैद्याला ठाण्यात अटक

बांगलादेशात काही दिवसांपूर्वी क्रूड बॉम्बसकट पकडल्यानंतर याप्रकरणी कारागृहात काही महिने शिक्षा भोगलेल्या, अली हुसेन नावाच्या २६ वर्षांच्या एका बांगलादेशी युवकाला ठाणे हप्ताविरोधी पथकाने अटक केली आहे.

Updated: Jul 10, 2014, 11:56 PM IST
बांगलादेशात बॉम्बसह पकडलेल्या कैद्याला ठाण्यात अटक title=

ठाणे : बांगलादेशात काही दिवसांपूर्वी क्रूड बॉम्बसकट पकडल्यानंतर याप्रकरणी कारागृहात काही महिने शिक्षा भोगलेल्या, अली हुसेन नावाच्या २६ वर्षांच्या एका बांगलादेशी युवकाला ठाणे हप्ताविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे हप्ताविरोधी पथकाचे अधिकारी डॉ़क्टर रवींद्र सिंगल यांना मिळालेल्या माहितीनुसार २६ वर्षांचा अली हुसेन हा डोंबिवलीत गोळवली गावातील जरीमरी चाळीत राहत होता़.

हुसेन हा आपल्या पत्नीसमवेत काही बांगलादेशीय तरुणींबरोबर वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती सिंगल यांना मिळाली होती़, त्यानुसार सिंगल यांनी डोंबिवलीतील त्याच्या राहत्या घरावर छापा मारुन त्याच्या पत्नीसह दोन बांगलादेशीय तरुणींना अटक केली आहे़.

हुसेन याला काही महिन्यांपूर्वी बांगलादेशी पोलिसांनी क्रूड बॉम्बसकट अटक केली होती़, याप्रकरणी त्याने काही महिने बांगलादेशी कारागृहात शिक्षाही भोगली आहे. काही महिन्यापूर्वी त्याला जामीन मिळाल्यावर तो भारतात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.