डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश

 नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश झालाय. प्रवेशाचं आमीष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणा-या तिघांना नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष विजय पाटील यांचा पीएच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय.

Updated: Feb 17, 2015, 10:10 AM IST
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश title=

नवी मुंबई : नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश झालाय. प्रवेशाचं आमीष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणा-या तिघांना नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष विजय पाटील यांचा पीएच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय.

मेडीकल आणि इंजिनिअरींग काँलेजमध्ये पैशांशिवाय ऍडमिशन मिळत नाही, असा सूर सर्वत्र उमटतोय. तशा घटनाही समोर येतायेत. डॉ. डी. वाय. पाटील ही राज्यातील एक मोठी शैक्षणिक संस्था आहे. नवी मुंबईत नेरुळमधील डॉ डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज नावाजलेलं आहे. इथं प्रवेश मिळवून देण्याच आमीष देऊन लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालना-या तिघांना अटक झाली. गंभीर बाब म्हणजे या प्रकाराचा सूत्रधार खुद्द डॉ डी वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष विजय पाटील यांचा पीए अभिजीत शेळके आहे.

शेळके हा मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन देतो असं सांगून त्यांच्या काढून कोट्यवधी रुपये उकळत असे. स्नेहल पवार आणि जयंत पवार या शेळकेच्या साथीदारानाही पोलिसांनी अटक केली आहे..कुलदीप पेडणेकर हे आपल्या मुलीच्या मेडिकलच्या एडमिशनसाठी शेळके यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे ६५ लाख रुपये मागण्यात आले. या ६५ लाख रूपयांपैकी ५० लाख रूपये पेडणेकर यांनी शेळके याला त्याच्या कॉलेज मधील कार्यालयात जाऊन दिले.पैसे दिले तरी अॅडमिशन झाले नाही. पेडणेकर यांनी माहिती घेतली असता हे अॅडमिशन शेळके याने अधिक पैसे घेऊन इतर व्यक्तीला दिल्याच कळालं. आपली फसगत झाल्याच कळताच पेडणेकर यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अशा प्रकारे या तिघांनी आणखी किती लोकांना फसवले आहे. या रॅकेटमध्ये डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिट मधील आणखी कोणी सहभागी आहे का याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.याप्रकरणी डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटीने काहीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.