नाशिकमध्ये अतिक्रमण हटवा मोहीमवेळी राडा

शहरातील भद्रकाली परिसरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली. यावेळी जमावाने पथकावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Updated: Jun 2, 2016, 03:36 PM IST
नाशिकमध्ये अतिक्रमण हटवा मोहीमवेळी राडा title=

नाशिक : शहरातील भद्रकाली परिसरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली. यावेळी जमावाने पथकावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

भद्रकालीतील फ्रूट मार्केट, दुधबाजार, महात्मा फुले मंडई परिसरात मोहीम राबवून अतिक्रमण विरोधी पथकाने मोहीम राबवून शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करून रस्ता मोकळा केला. मनपाच्या कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाने पथकावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.