एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका

एफटीआयआयचा ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट) वाद चिघळलाय. मध्य रात्री ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांनी जामीन मिळावा, यासाटी अर्ज केला होता.

Updated: Aug 19, 2015, 07:09 PM IST
एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका title=
संग्रहीत

पुणे : एफटीआयआयचा ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट) वाद चिघळलाय. मध्य रात्री ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांनी जामीन मिळावा, यासाटी अर्ज केला होता.

एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठरांबे यांनी विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल होती. एफटीआयआयमध्ये सोमवारी रात्री घडलेला प्रकार पूर्वनियोजीत होता, असा आरोप संचालक प्रशांत पाठराबे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करून ५ विद्यार्थ्यांना अटक केली होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे एफटीआयआयचा हा वाद आणखीनच चिघळला असून ऐन मध्यरात्री विद्यार्थ्यांचे अटकसत्र राबवणाऱ्या पोलिसांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

सोमवारी रात्री ४० ते ५० विद्यार्थी ऑफीसमध्ये घुसले, ६ विद्यार्थी चर्चेसाठी येणार, असं ठरले होते. त्यांनी आपल्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ऑफीसमध्ये तोडफोड केली. आपल्याला मानसिक त्रास दिला त्यामुळे आपण पोलिसांकडे तक्रार केली असं पाठराबे यांनी म्हटले. 

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना अटक केल्यामुळं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून टीका केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.