प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

Updated: Jun 8, 2016, 10:39 PM IST
प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस title=

मुंबई : मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. कोल्हापुरात अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाळी. यावेळी जोरदार वारेही होते. तसेच महाबळेश्वर या पर्यटन स्थळावर पावसामुळे पर्यटकांची त्रेधा उडाली आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटकांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाई-महाबळेश्वर मार्गावर एका कारवर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प होती.

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात चांगला पाऊस झाला. रत्नागिरीत खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी शहरात चांगला पाऊस झाला. तर सिंधुदुर्गात सावंतवाडी, कुडाळ या ठिकाणी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळ होता. मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाल्याने शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळालाय.

दरम्यान, विदर्भातील नागपूरमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला.