दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, १४ पासून जेलभरो

दुष्काळाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठवाड्यात सरकारविरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

Updated: Sep 4, 2015, 12:05 AM IST
दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, १४ पासून जेलभरो title=

नाशिक : दुष्काळाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठवाड्यात सरकारविरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

नाशिक आणि नगर जिल्ह्यातही १५ सप्टेंबरला जेरभरो करण्यात येणार आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीची मुख्य मागणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी सरकारविरोधात आक्रमक होण्याचे आदेश शरद पवार यांनी या बैठकीत नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

राज्यात यंदा पावसानं ओढ दिल्यानं दुष्काळाच्या झळांची तीव्रता अधिकच वाढलीय. १९७२ सालच्या दुष्काळाप्रमाणेच यंदाचा दुष्काळ असल्याची भिती व्यक्त होतेय. त्यातच जुलै, ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिनाही कोरडाच जाण्याचा अंदाज वर्तवल्यानं देशाचा बहुतांश भाग दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.

सरासरीच्या ८८ टक्के अंदाजापेक्षाही कमी पाऊस आतापर्यंत झालाय.. त्यामुळं ११५ वर्षांत चौथ्यांदा भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भिती आहे.. राज्यात सरासरीच्या ३४ टक्के कमी तर सर्वात कमी पाऊस सरासरीच्या ५१ टक्के कमी पाऊस मराठवाड्यात झालाय.

दुसरीकडे सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून परतण्यास सुरुवात होते.. मात्र याच आठवड्यात मान्सूनचा प्रवास परतीच्या मार्गानं सुरु होणार असल्याची माहिती हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलंय.. त्यामुळं खरोखरच मान्सून परतला तर दुष्काळाचे चटके अधिक भीषण असणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.