श्रुती आत्महत्या प्रकरण : पीएसआय खटावकर निलंबित

श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी पीएसआय हरिश खटावकरला निलंबित करण्यात आले आहे. श्रुती कुलकर्णीने स्वप्निल मणियार या तरूणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती.

Updated: Aug 22, 2015, 03:07 PM IST
श्रुती आत्महत्या प्रकरण : पीएसआय खटावकर निलंबित title=

औरंगाबाद : श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी पीएसआय हरिश खटावकरला निलंबित करण्यात आले आहे. श्रुती कुलकर्णीने स्वप्निल मणियार या तरूणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती.

श्रुतीने या विषयी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, पण हरिश खटावकरने, श्रुतीला तेथून हुसकावून लावलं होतं. यानंतर कोणताच पर्याय राहिला नसल्याने तिने आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येतंय.

श्रुती जेव्हा तक्रार दाखल करण्यास आली, तेव्हा श्रुतीची बहिण श्रद्धाने दिलेल्या माहितीनुसार, श्रुतीला हरिश खटावकर म्हणाला होता, तू तशीच आहेस म्हणून तुझ्यामागे मुलं आहेत, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशा वागतात, अशा शब्दात हरिश खटावकर श्रुतीला बोलला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.