ठाण्याचा पश्चिम भाग घेणार मोकळा श्वास...

किचकिचाटानं भरलेला ठाणे पश्चिम भाग बससाठी मोकळा करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेनं घेतलाय. 

Updated: Mar 5, 2016, 06:14 PM IST
ठाण्याचा पश्चिम भाग घेणार मोकळा श्वास...  title=

ठाणे : किचकिचाटानं भरलेला ठाणे पश्चिम भाग बससाठी मोकळा करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेनं घेतलाय. 

बससाठी मार्ग रिकामा करायचा असेल तर इथं थाटलेली अवैध दुकानं आणि स्टॉल्स उठवणं भाग आहे... यासाठी, पालिका अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर अवैध दुकानं थाटलेल्या मालकांना एक अधिकृत नोटीसही धाडलीय. 


ठाणे पश्चिम परिसर

दुकानं हटवली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, कारवाई होण्याआधीच इथल्या दुकानदारांनी आपापले स्टॉल्स आणि सामान इथून हलवण्याच्या हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे लवकरच हा भागदेखील मोकळा श्वास घेऊ शकेल.


ठाणे पश्चिम परिसर

 
दरम्यान, नुकतंच ठाणे महापालिकेने स्टेशन परिसर आणि जांभळी नाका ते स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात पालिकेनं कारवाईचंही पाऊल उचललं. गेल्या मंगळवारी एका दिवसांत ४५५ व्यापारी गाळ्यांचे बेकायदा बांधकाम हटवण्यात आलं. तर दोन मजल्याची कोहिनूर इमारतही जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईचं स्वागत करत परिसरातील नागरिकांनी चॉकलेटसही वाटली होती.