'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान, इथे पाहा अधिकृत वेबसाईट

म्हाडाची बोगस वेबसाईट असल्याचं समोर आलंय.. म्हाडाच्या बेवसाईटप्रमाणे हुबेहुब दिसणारी दुसरी बोगस वेबसाईट कार्यरत झाली आहे. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 21, 2015, 10:15 AM IST
'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान, इथे पाहा अधिकृत वेबसाईट title=

मुंबई : म्हाडाची बोगस वेबसाईट असल्याचं समोर आलंय.. म्हाडाच्या बेवसाईटप्रमाणे हुबेहुब दिसणारी दुसरी बोगस वेबसाईट कार्यरत झाली आहे. 

म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा :- https://mhada.maharashtra.gov.in/

मुंबईतील १०६३ घरांच्या विक्रीसाठी १५ एप्रिलला म्हाडाने जाहिरात दिली. यासाठी, ऑनलाइन अर्ज आणि रजिस्ट्रेशनसाठी १८ मेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. 

आपण गुगलवर म्हाडा वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्याला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटशिवाय http://www.mhadalottery2015.in/ हे संकेतस्थळही दिसतं.  पण, ही फेक वेबसाईट असून म्हाडाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. 

धक्कादायक म्हणजे, या संकेतस्थलाच्या रजिस्ट्रेशनसाठी म्हाडाच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली वाघ-संधानसिंग यांच्या नावाचा गैरवापर केल्याचंही दिसून येतंय. 

याबाबत, 'पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली असून ही फेक वेबसाईट लवकरच बंद करण्याची प्रक्रिया म्हाडानं सुरू केल्याचं' म्हाडाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.