एकदिवसीय दौऱ्यासाठी पंतप्रधान मुंबईत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदींचं विमानतळावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्वागत केलं. 

Updated: Jul 21, 2014, 02:47 PM IST
एकदिवसीय दौऱ्यासाठी पंतप्रधान मुंबईत दाखल title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदींचं विमानतळावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्वागत केलं. 

नरेंद्र मोदी यावेळी ते तारापूरच्या भाभा अणू संशोधन केंद्राला भेट देणार असून तेथील अणूशास्त्रज्ञांशी चर्चा करणार आहेत. भाभा अणू संशोधन केंद्रातल्या संशोधनाबाबत ही चर्चा असेल अशी माहिती सुत्रांनी दिलीय. 

यावेळी पंतप्रधानांना इंडियन प्रेसराइज्ड वॉटर रिऍक्टर, लार्ज स्केल एक्सीलिरेटर्स, इंडियन न्यूट्रीनो ऑब्जर्वेटरी आणि लार्ज साइज न्यूक्लियर रिसायकल प्लांटबाबत माहिती देण्यात येणार आहे. 

तसंच ऍडव्हान्स्ड हेवी वॉटर रिऍक्टर म्हणजे एएचडब्ल्यूआर संदर्भातही माहिती दिली जाईल. एएचडब्ल्यूआर थोरियमपासून उर्जा उत्पन्न करते. या रिऍक्टरपासून 300 मेगावॅट उर्जा उत्पन्न केली जाऊ शकते.  

पंतप्रधानांच्या या मुंबई दौ-यात दुसरा कोणताही कार्यक्रम नसून त्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला परत जातील. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.