बेस्ट ड्रायव्हरचा दोघा वरिष्ठांवर कोयत्याने हल्ला

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये आज जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीच्यावेळी बेस्ट ड्रायव्हरने आपल्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला चढवला. दरम्यान, या तिघांनाही उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Sep 5, 2014, 02:29 PM IST
बेस्ट ड्रायव्हरचा दोघा वरिष्ठांवर कोयत्याने हल्ला title=

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये आज जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीच्यावेळी बेस्ट ड्रायव्हरने आपल्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला चढवला. दरम्यान, या तिघांनाही उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बेस्ट ड्रायव्हर शंकर माने याने कोयत्याने हल्ला केला आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी दहा वाजता बस डेपोमध्ये ही घटना घडली. 

शिफ्टवरुन बेस्ट ड्रायव्हर शंकर माने आणि रेकॉर्ड मेन्टेन करणारे शेडगे आणि डोंगरे यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर चालकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारामुळे डेपोमध्ये तणावाचे वातावरण होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.