दाभोलकरांची हत्या सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट - राणे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे. ही संपूर्ण सरकाराची जबाबदारी आहे, असा घरचा आहेर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 21, 2013, 10:03 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, लोणावळा
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे. ही संपूर्ण सरकाराची जबाबदारी आहे, असा घरचा आहेर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलाय. याआधी दाभोलकर यांच्या हत्या ही महाराष्ट्र सरकारला आणि गृहमंत्र्यालयाला कमीपणा आणणारी बाब आहे, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. आता राणे यांनी बोचरी प्रतिक्रिया दिल्याने सरकार अडचणीत सापडले आहे.
दाभोलकर यांच्या हत्या ही महाराष्ट्र सरकारला आणि गृहमंत्र्यालयाला कमीपणा आणणारी बाब आहे, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. हा हल्ला कोणी घडवून आणला आहे. त्याच्याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिलेत. या घटनेच्या खोलात जाऊन तपास करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व सामान्य जनतेला या घटनेची माहिती मिळाली पाहिजे. तशी चौकशी पोलीस करतील, अशी माहिती अजित पवार यांनी या घटनेनंतर दिली.
दाभोलकरांच्या हत्येनं आपल्याला धक्का बसल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलंय. ते सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. `झी मीडिया`ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अण्णांनी या हल्ल्याचा निषेध केलाय.
नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा पुण्यातील कला साहित्य आणि चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनीही तीव्र निषेध केलाय. दाभोलकर यांचे विचार संपणार नाहीत असं मतही या कलाकारांनी व्यक्त केलं. या कलाकारांनी आज पुण्यात पदयात्रा काढली होती त्यावेळी काही जणांना भावना आवरणंही कठीण
दरम्यान, प्रबोधनकारांचे विचार पुढे नेणा-या डॉ. दाभोलकरांच्या हत्येनं महाराष्ट्राच्या पुरागामी चळवळीची भरून न निघणारी हानी झालीये, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीये. मला संशयाची सुई नको. कुठल्याही परिस्थितीत हल्लेखोर पकडले जायला हवेत. अन्यथा संशयाची सुई सरकारकडेच जाते, असं ते म्हणाले. ज्यांची दुकानं या गोष्टींवर चालतात, त्यांचेच काम आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.