सध्या गालावर टाळी वाजवतोय – राज ठाकरे

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, February 11, 2013 - 22:40

www.24taas.com, सातारा
राज्यातील लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्या प्रश्नाला आज पुन्हा राज ठाकरे यांनी बगल दिली आहे. शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न साताऱ्यात पत्रकारांनी विचाराला पण आपल्या खास शैली राज ठाकरे यांनी पत्रकारांना उत्तर दिले.
‘दुसरे काही प्रश्न नाहीत का?’ असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. तसेच ‘सध्या मी गालावर टाळी वाजवण्याचे काम करतो आहे,’ असे सांगून राज ठाकरे यांनी अधिक बोलणे टाळले.

मंत्र्यांनी दुष्काळ भागात दौरे काढून काय साधले आहे. ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाना ना आधार. राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
राज ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. दुष्काळाबाबत सरकावर जोरदार हल्लाबोल राज यांनी केला. दुष्काळाचे सरकारला काहीएक देणं घेणं नाही. केवळ दौरे काढण्यात मंत्री मग्न आहेत. काय मिळालं तुम्हाला, असा संवाद राज यांनी दुष्काळग्रस्तांशी साधला.
राज ठाकरे १२ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी शिवसेनेने तीन टोल नाके पेटवून दिले. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष आहे. या आधीच राज यांनी टोल विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सेनेचे आंदोलन हे कशाचे द्योतक आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

First Published: Monday, February 11, 2013 - 22:40
comments powered by Disqus