डी कंपनीचा टी-20 वर्ल्ड कपवर डोळा

 टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळे सट्टेबाजीसाठी कुख्यात असलेली डॉन दाऊद इब्राहिमची डी कंपनी सक्रीय झालीय.

Updated: Mar 10, 2016, 09:14 PM IST
डी कंपनीचा टी-20 वर्ल्ड कपवर डोळा title=

मुंबई: टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळे सट्टेबाजीसाठी कुख्यात असलेली डॉन दाऊद इब्राहिमची डी कंपनी सक्रीय झालीय. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने जगभरातील बड्या सट्टेबाजांची एक मिटिंग बोलावली असून त्यामध्ये टी-20 क्रिकेट सामन्यावरच्या सट्टेबाजीवर प्लॅनिंग केलं जाणार आहे.

अनिस इब्राहिमने 10 मार्चला जगातील बड्या सट्टेबाजांची एक गुप्त बैठक बोलावली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.या बैठकीत तीन  प्रमुख मुद्दयांवर चर्चा होणार आहे.

टीम आणि प्लेअरवर लागणा-या सट्ट्याचा भाव, या वर्ल्डकपमधून होणारी कमाई, भारतीय तपास यंत्रणांना कसा  गुंगारा देणार ? या बाबींवर मिटिंगमध्ये चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगीतलंय. डी कंपनीने प्रत्येक प्लेअर आणि टीमवर लागणा-या सट्ट्याचा भाव आधीच निश्चित केले आहेत.

या मीटिंगमध्ये  भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह जवळपास 12 देशातील बडे सट्टेबाज सहभागी होणार आहेत. या मीटिंगनंतर  सट्टाबाज़ीला सुरुवात होणार असून भारत -पाकिस्तान मॅच सामन्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सट्टा लागणार आहे.

सट्टेबाजांची पसंती भारताला

भारत - 3.3 रुपये

ऑस्ट्रेलिया - 6.4 रुपये

द.आफ्रिका - 6.8 रुपये

इंग्लंड - 9 रुपये

न्यूझिलंड - 13.5 रुपये

वेस्ट इंडिज - 15.5 रुपये

पाकिस्तान - 17 रुपये

श्रीलंका - 29 रुपये

बांग्लादेश - 44 रुपये

झिंम्ब्बाब्वे - 670 रुपये

अफगाणिस्तान- 800 रुपये

विराट कोहलीवर सट्टेबाजांना विश्वास

विराट कोहली- 9 रुपये

रोहित शर्मा - 10 रुपये

डेव्हिड वॉर्नर - 12.5 रुपये

ए.बी. डेव्हिलिअर्स - 13 रुपये

क्विन्टॉन डि कॉक 15.5 रुपये

ख्रिस गेल - 16.5 रुपये