तरच भारताची वनडेतली क्रमवारी सुधारणार

न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं 3-0नं जिंकून टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवलं.

Updated: Oct 14, 2016, 10:31 PM IST
तरच भारताची वनडेतली क्रमवारी सुधारणार  title=

धरमशाला : न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं 3-0नं जिंकून टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवलं. टेस्टनंतर आता वनडेमध्ये किवींना चिरडण्यासाठी भारत सज्ज आहे. वनडे क्रमवारीमध्ये भारत सध्या 110 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे, तर 114 पॉईंट्ससह न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये भारताला वरच्या क्रमांकावर जायचं असेल तर ही सीरीज 4-1 किंवा 5-0नं जिंकणं आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेनं नुकतच ऑस्ट्रेलियाला वनडेमध्ये 5-0नं हरवलं. यानंतरही ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजला रविवारपासून धरमशालामध्ये सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारताची वनडेमधली कामगिरी समाधानकारक राहिली नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच भारताला ऑस्ट्रेलियानं 4-1नं हरवलं होतं, त्याआधी मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशकडूनही भारताचा पराभव झाला होता.