पावसाचा कोकण-बुलडाणा जिल्ह्याला तडाखा, एकाचा बळी

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, October 5, 2013 - 13:26

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी, बुलडाणा
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. रत्नगिरी जिल्ह्यीतील खेड तालुक्यात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. या पावसाचा एक बळी गेलाय.
खेडमध्ये पुरामुळे जगबुडी आणि नारिंगी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक व्यवस्थेलाही पुराचा फटका बसत आहे. ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडत असल्याने ऑक्टोबर हिटपासून नागरिकांची सुटका झाली असली तरी नवरात्र उत्सवावर विरजण पडले आहे.
परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार पसरवला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातले महामार्ग बंद पडले आहेत. पावसामुळे शेतक-यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर, वीज पडून एका शेतकरी मुलाचा तर दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. राजेश साळंके असं मृत तरुणाचं नाव आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालाय. पैनगंगा नदीच्या पेठ गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने नागपूर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, October 5, 2013 - 13:22
comments powered by Disqus