`राज` तुला ठेवू तरी कुठं...

`इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनिंनो...` हे शब्द कानावर पडताच, संपूर्ण मैदानात एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि मराठीची साद घालणाऱ्या नेत्याचा जयजयकार.

Updated: Feb 26, 2013, 07:13 AM IST

रोहित गोळे, कॉपी रायटर, 24taas.com
`इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनिंनो...` हे शब्द कानावर पडताच, संपूर्ण मैदानात एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि मराठीची साद घालणाऱ्या नेत्याचा जयजयकार.. हो.. अगदी असचं वातवरण असतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला... राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आणि महाराष्ट्राचं राजकारण चांगलचं ढवळून निघालं... मग मराठीचा मुद्दा असो किंवा ठाकरे बंधू एकत्र येणार का? यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झडत होत्या. आणि राज ठाकरे यांची मुलुखमैदान तोफ अखेर धडाडत होती..
`मी महाराष्ट्राचा, आणि महाराष्ट्र माझा` मनसे पक्ष स्थापनेच्या पहिल्याच सभेत अशी साद घालणाऱ्या राज ठाकरे यांनी अनेक तरूणांच्या काळाजाला हात घातला. राज यांचा बुलंद आवाज साऱ्यानांचा भुरळ घालू लागला. राज यांच्यावरून जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात राज ठाकरेंविषयी कुतूहल निर्माण झालं. मराठीचा मुद्दा घेत राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या काळजाला अक्षरश: हात घातला... आणि त्याचं तेच काळीज राज यांनी अलगद चोरूनही नेलं.. म्हणा ना...`राज ठाकरे` या नावाभवती एक वेगळं वलय निर्माण झालं... त्यांच्या भाषणासाठी लाखोने गर्दी करणारे त्यांचे हेच तरूण लढवय्ये कानात प्राण आणून फक्त त्यांच्या`एका आदेशाची` वाट पाहू लागले..

आता महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी पुढे सरसावलेत. राजकारणी नेत्याबाबत नेहमीच उत्सुकता ही साऱ्यानांच लागून राहिलेली असते. आणि त्यात राज हे तर तरूणांचे नेते... ठाकरी शैलीची नैसर्गिक देणगी लाभलेले, आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जडणघडणीत तावून सुलाखून तयार झालेले राज असतील तरी कसे? याबाबात साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात झाली... लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते जमू लागले.. सभेसाठी जागा अपुऱ्या पडू लागल्या... राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी एकच गर्दी होऊ लागली.. महाराष्ट्रभरही सारेच त्यांना पडद्यावर पाहू लागले... मग काय नाक्यानाक्यावर तीच चर्चा... पण हेच राज सभेच्या ह्या मधल्या काळात करतात तरी काय? कसा साधतात कार्यकर्त्यांशी संपर्क? कसा साधतात संवाद सामान्यांशी... हेच ह्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले...
ठिकाण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु़डाळ.. राज महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त कोकणात उतरले.. यांनी तेथील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी स्वत: नागरिकांशी संवाद साधला, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या... कुडाळमध्ये असताना राज ठाकरे फेरफटका मारण्यासाठी सहजच बाहेर पडले... राज बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत अगदीच तीन ते चार जण सोबत होते.... राज यांची स्वारी हळूहळू कुडाळच्या बाजारपेठेत आली... पण हा हा म्हणता... त्यांच्या पाठीशी तीनेशे ते चारशे जण जमले होते. अनेकांना प्रश्न पडला की, आता हा कोणता मोर्चा निघाला?
पण तो मोर्चा नसून राज ठाकरेंच्या चाहत्यांची ती गर्दी होती. राज ठाकरेनेंही कुणालाच नाराज केले नाही. प्रत्येकासोबत फोटो काढणं, लहान मुलांना अगां-खांद्यावर घेऊन त्यांच्याशी गुजगोष्टी करणारे राज साऱ्यांनाच आपलेसे वाटू लागले. मग काय.. हळूहळू गर्दी वाढतच होती.. त्यातही राज ठाकरे यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या.. अशाच एका कार्यकर्त्याच्या घरात राज गेले.. घर तसं साधसं... त्या घरात असणाऱ्या कार्यकर्त्याच्या म्हाताऱ्या आईने राज यांना पाहताच्या तिला `आकाशही ठेगणं झालं,` आणि साहजिकच त्या माऊलीने कानशिलावरून आपली बोटं मोडली... `माझ्या राजाला कुणाची नजर न लागो..` अशीच जणू काही ती पुटपुटली...
राज यांना कुठे ठेऊ आणि कुठे नको अशीच काहीशी तिची अवस्था झाली.. घरात आलेल्या पाहुण्याला खाली हातानं धाडायचं कसं? असा प्रश्न तिला पडला.. शेवटी पटदिशी आत जाऊन तिने राज ठाकरेंसाठी एक केळं आणलं.. केळं राज ठाकरेंना देताना.. तिच्या मनात प्रश्न आलाच असेल, एवढा मोठा नेता... आपल्या गरीबा घरचं खाणार? पण एखाद्याचं मन जिकांयचं कसं हे राज ठाकरेंनाही चांगलंच ठाऊक... मायेने दिलेलं त्या केळ्याचा राज ठाकरेंनी स्वीकारच केला नाही, तर ते त्या माऊलीसमोर खाल्ल देखील...
तर लगेचच तेथून राज दुसऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले... `चानी` ह्या सिनेमाचं ह्या घरात शूटींग झालं हो