IND vs WI, 2nd Odi | टीम इंडियाचा विंडिजवर 44 धावांनी विजय, मालिकाही जिंकली

टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 धावांनी विजय मिळवला आहे. 

Updated: Feb 9, 2022, 10:11 PM IST
IND vs WI, 2nd Odi | टीम इंडियाचा विंडिजवर  44 धावांनी विजय, मालिकाही जिंकली title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

अहमदाबाद : टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 238 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर विंडिज 46 षटकांमध्येच 193 धावांवर ऑलआऊट झाले. विंडिजकडून  शमर ब्रूक्सने सर्वाधिक 44 धावा केल्या.  (ind vs wi 2nd odi team india beat west indies by 44 runs and win series at narendra modi stadium ahmedabad) 

भारताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर उर्वरित सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेत प्रसिधला चांगली साथ दिली.  या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 

दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि अखेरचाही सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर 11 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून विंडिजला क्लीन स्वीप देण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. तर मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न पाहुण्यांचा असेल. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि प्रसीद्ध कृष्णा. 

विंडिज टीम :  निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शमारह ब्रुक्स, डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, फॅबियन अॅलन, अल्झारी जोसेफ आणि केमार रोच.