दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बनला लाजीरवाणा रेकॉर्ड

सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 4, 2018, 05:10 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बनला लाजीरवाणा रेकॉर्ड title=

सेंच्युरीयन : सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.

आफ्रिकेचा संघ ढासळला

भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदांजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. भारतीय फिरकी पुढे दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ 118 रनवर ढासळला. आणि यासोबतच आफ्रिकेच्या नावावर एक रेकॉर्ड देखील झाला.

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलचा सामना कोणीच करु नाही शकले. 32.2 ओव्हरमध्ये आफ्रिकेने 118 रन केले. चहलने पाच विकेट तर कुलदीपने तीन विकेट घेतल्या. कुलदीपने आठ ओव्हरमध्ये फक्त 20 रन दिले. चहलने 8.2 ओव्हरमध्ये 22 रन दिले. चहलने पहिल्यांदा वनडेमध्ये 5 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा हा घरच्या मैदानात सर्वात कमी स्कोर आहे. आफ्रिकेच्या याआधी 2009 मध्ये इंग्लंडने घरच्या मैदानावर सर्वात कमी रन केले होते. इंग्लंड 119 रनवर ऑलआऊट झाला होता.

- भारतीय टीमचा सर्वात कमी स्कोर 54 रन आहे. 2000 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात शारजाहमध्ये भारतीय टीम 54 रनवर ऑलआऊट झाली होती. 

वनडेमध्ये कमी स्कोरवर ऑलआऊट होणारे 5 संघ

- 25 एप्रिल 2004 ला हरारेमध्ये श्रीलंकेच्या विरोधात जिम्बाब्वेची संपूर्ण टीम फक्त 18 ओव्हरमध्ये 35 रनवर ऑलआऊट झाली होती. 

- 19 फेब्रुवारी 2003 ला पार्लच्या मैदानावर श्रीलंकेच्या टीमने कनाडाला 18.4 ओव्हरमध्ये 36 रनवर ऑल आउट केलं होतं. कर दिया था.

- 8 डिसेंबर 2001 ला कोलंबोमध्ये श्रीलंकेच्या विरोधात जिम्बाब्वेने 15.4 ओव्हरमध्ये फक्त 38 रन केले होते.

- 11 जानेवारी 2012 ला पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेच्या टीमला 43 रनवर ऑलआउट केलं होतं. 

- 25 फेब्रुवारी 1993 ला केपटाउनमध्ये वेस्टइंडीज विरोधात पाकिस्तानची टीम 43 रनवर ऑल आउट झाली होती.