श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 4, 2017, 08:27 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर  title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत वनडे प्रमाणेच टी-20मध्येही रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. वॉश्गिंटन सुंदर, दीपक हुडा, बसील थंपी आणि जयदेव उनाडकट यांना संधी देण्यात आली आहे. टेस्ट सीरिजनंतर भारत श्रीलंकेविरुद्ध आधी 3 वनडे आणि मग 3 टी-20ची सीरिज खेळणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध भारताची टी-20 टीम

रोहित शर्मा (कॅप्टन), के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बसील थंपी, जयदेव उनाडकट

श्रीलंकेविरुद्ध भारताची वनडे टीम 

रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम.एस. धोनी, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल

वनडे सीरिज

पहिली वनडे- १० डिसेंबर- धर्मशाला

दुसरी वनडे- १३ डिसेंबर- मोहाली

तिसरी वनडे- १७ डिसेंबर- विशाखापट्टणम

टी-20 सीरिज

पहिली टी-20- २० डिसेंबर- कटक

दुसरी टी-20- २२ डिसेंबर- इंदूर

तिसरी टी-20- २४ डिसेंबर- मुंबई