मुंबई मनपा

मुंबई | फेरीवाल्यांसंदर्भात मनसेने केली नवी मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 08:56 PM IST

मुंबई मनपाच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचं वाटप

मुंबई महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान पर्दाफाश केला आहे. फाटलेलं दप्तर, तुटलेले टिफीन बॉक्स पालिका सभागृहात आणून पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

Sep 27, 2017, 10:29 AM IST

मुंबई मनपाच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे. पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यासाठी बंद पडलेल्या या ३५ शाळा खासगी संस्थांना दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातल्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Jul 11, 2017, 10:48 AM IST

जीएसटीनंतर अर्थमंत्री मुंबई पालिकेला देणार 700 कोटींचा चेक

जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापालिकेला सुपूर्द करणार आहेत. हा चेक मुनगंटीवार पालिका मुख्यालयात येऊन सूपूर्द करतील. 700 कोटींचा हा चेक असेल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुख्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यानिमित्त भाजपकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यताय. जीएसटी लागु झाल्यानं जकात रद्द झाली आहे. 

Jul 4, 2017, 01:35 PM IST

मुंबई मनपाचे दीड तासात दीड हजार कोटींचे ९७ प्रस्ताव मंजूर

महापालिकेच्या स्थायी समितीत अवघ्या दीड तासात तब्बल दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळून या करोडो रूपयांच्या कामांना मंजुरी दिली.

Dec 28, 2016, 06:45 PM IST

मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा पुढे आला आहे. कचरा वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे.कंत्राटदारानं कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा नंबर काय याची नोंद न करताच बिलं मंजूर करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

Dec 8, 2016, 04:34 PM IST

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

Oct 20, 2016, 06:20 PM IST

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Oct 20, 2016, 06:04 PM IST

मुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट

मुंबई महापालिकेत घोटाळ्यातील आरोपी असलेल्या वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट देण्याचा कारनामा मुंबई महापालिकेनं केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

May 4, 2016, 08:58 PM IST

मुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट

मुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट

May 4, 2016, 04:58 PM IST

मुंबई मनपाची बिल्डरांवर एफएसआयची खैरात

मुंबई मनपाची बिल्डरांवर एफएसआयची खैरात

Apr 27, 2016, 08:00 PM IST

मुंबई मनपाचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर

मुंबई मनपाचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर

Feb 3, 2016, 06:09 PM IST