लता मंगेशकर

‘जयप्रभा’नं धुडकावले न्यायालयाचे आदेश…

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. विक्री व्यवहारामुळे वादग्रस्त ठरलेल्या जयप्रभा स्टुडिओचे कामकाज ‘जैसे थे’ ठेवण्याचे कोर्टाचे आदेश धुडकावून लावत रविवारी रात्रीपासून इथं साहित्य हलवण्यास सुरुवात झालीय.

Oct 8, 2012, 12:40 PM IST

मिले सूर मेरा-तुम्हारा....

‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...’ अक्षरशः असंच चित्र मंगेशकर कुटुंबाच्या घरगुती गणपती विसर्जनच्यावेळी काल आम्हाला पाहायला मिळालं. ढोल-ताशाचा नजरा, बाप्पासाठी खास केलेली फुलांची सजावट, फेटे बांधलेल्या मंगेशकर कुटुंबाचा थाट, आणि यासगळ्यामध्ये सगळ्यांसाठी सुखद धक्का म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले यांचं एकत्र घडलेलं दर्शन...

Sep 30, 2012, 03:46 PM IST

लतादीदींवर झाला होता विषप्रयोग!

तब्बल सहा दशके ५० हजारांहून अधिक गाणी आपल्या जादुई स्वरात गाऊन जागतिक विक्रम करणार्या् गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यावर पन्नास वर्षांपूर्वी ‘विषप्रयोग’ झाला होता. त्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रख्यात डोगरा कवयित्री पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहां से लाऊ’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल एक खळबळजनक घटना लिहिली आहे आणि ही घटना खुद्द लतादीदींनीच आपल्याला सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Sep 29, 2012, 04:04 PM IST

लतादीदी खोटारड्या... रफींच्या मुलाचा आरोप

एका वृत्तपत्रात लतादीदींनी दिलेल्या मुलाखतीनंतर वादाला तोंड फुटलंय. मुहम्मद रफी यांनी एकेकाळी आपल्याला लेखी माफिनामा दिल्याचं वक्तव्य लतादिदिंनी केलंय आणि त्यामुळेच सुरु झालाय एक नवा वाद...

Sep 27, 2012, 12:06 AM IST

जयप्रभा स्टुडिओ विक्रीस सध्या स्थगिती

जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा वाद कोर्टात गेल्यावर दिवाणी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत विक्रीची कोणतीही प्रक्रिया करू नये ,` असा आदेश दिला आहे. न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी सोमवारी आदेश दिला. या आदेशामुळे लता मंगेशकर यांना जयप्रभा स्टुडियो सध्यातरी विकता येणार नाही.

Sep 4, 2012, 04:50 PM IST

लता मंगेशकरांना कारणे दाखवा नोटीस

जयप्रभा स्टुडिओ विक्रीप्रकरणी कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं गानसम्राज्ञी लता मंगशकर यांना नोटीस पाठवलीय.

Aug 31, 2012, 08:35 PM IST

कोल्हापूरकरांचा लतादीदींविरोधात मोर्चा

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकल्याबद्दल कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा निषेध व्यक्त केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर दोघांनाही कोल्हापूर पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे.

Aug 28, 2012, 12:34 PM IST

'...हे माझं दुर्देव' - लतादीदी

‘मेहदी हसन जेव्हा स्वस्थ होते आणि गात होते तेव्हा मी त्यांच्यासोबत गाऊ शकले नाही, हे माझंच दुर्देव’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. मेहदी हसन यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर त्यांचा स्वर दु:खी झाला.

Jun 13, 2012, 04:19 PM IST

"सचिन राज्यसभेत यशस्वी होईल"- लता

सचिन तेंडुलकरचं नाव खासदारकीसाठी नियुक्त केल्यावर त्यावर बऱ्याच टीका झाली. यासंदर्भात बोलताना प्रख्यात गायिका लता मंगेशकर म्हणाल्या, जर सचिन आपल्या बिझी शेड्युमधून वेळ काढू शकला तर तो नक्की चांगला खासदार बनू शकतो.

Apr 29, 2012, 05:42 PM IST

सचिनने निवृत्ती का पत्करावी?- लता मंगेशकर

सचिनने निवृत्ती का पत्करावी हा सवाल आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा...सचिनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी शंभरावे शतक झळकावल्यामुळे लता मंगेशकरांना आनंद झाला आहे. पण त्याचबरोबर सचिनने आता निवृत्त व्हावं असं सूचवलं जात असल्यामुळे त्या नाराजही आहेत.

Mar 20, 2012, 04:35 PM IST

मंगेशकर कुटुंबियांवर चिखलफेक का? - उद्धव

सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची मागणी ज्यांनी केली ते आता पेडर रोडच्या फ्लाय ओव्हरवरून मंगेशकर कुटुंबियांना लक्ष्य करीत आहेत, उड्डाणपुलाचे निमित्त करून महाराष्ट्राच्या मानचिन्हावर चिखलफेक करू नये, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

Dec 7, 2011, 01:13 PM IST

मंगेशकरांसाठी कायद्यात पळवाट का? – राज ठाकरे

मुंबईतील पेडर रोडवरील फ्लायओव्हर झाला नाही तर मुंबईत एकही फ्लाय ओव्हर होऊ देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याने पुन्हा एकदा पेडर रोड फ्लाय ओव्हरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Dec 6, 2011, 06:13 PM IST

'पेडर रोड उड्डाणपुलात' आता राज यांची उडी

पेडर रोडवरील रखडलेला फ्लायओव्हर लोकांच्या हिताचा असेल तर तो झालाच पाहिजे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. मुंबईत इतर ५५ फ्लायओव्हर्स झाले तेव्हा लोकांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

Dec 6, 2011, 04:07 AM IST

लतादीदींचे आज ८२व्या वर्षात पदार्पण

गानसम्राज्ञी आज ८२व्या वर्षात पदार्पण करत आहे. लता दीदींनी आजवर ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे.

Sep 28, 2011, 03:01 PM IST