लॉन्च होण्याआधीच मारूती सुझुकीच्या या नव्या कारची ११ हजारात बुकींग सुरू

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने त्यांची नवीन दमदार कार S-Cross च्या नव्या व्हर्जनचं बुकींग लॉन्च आधीच सुरू केलंय. ही कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.

Updated: Sep 26, 2017, 12:57 PM IST
लॉन्च होण्याआधीच मारूती सुझुकीच्या या नव्या कारची ११ हजारात बुकींग सुरू title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने त्यांची नवीन दमदार कार S-Cross च्या नव्या व्हर्जनचं बुकींग लॉन्च आधीच सुरू केलंय. ही कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन S-Cross चं बुकींग केवळ ११ हजार रूपयांमध्ये केलं जाऊ शकतं. या कारचं बुकींग नेक्साच्या शोरूममधून करू शकाल.  

मारूती सुझुकीने S-Cross ही कार याआधी ऑगस्ट २०१५ मध्ये लॉन्च केली होती. त्याचवेळी कंपनीने त्यांची नवीन शोरूम चेन नेक्साही सुरू केली होती. आतापर्यंत कंपनीकडून S-Cross चे एकूण ५३ हजार मॉडेल विकण्यात आले आहेत. 

S-Cross च्या नव्या मॉडलमध्ये काय फिचर्स असणार हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालं नसलं तरी मीडिया रिपोर्टनुसार, या कारमध्ये १.३ लिटरचं डिझल इंजिन असेल. सोबतच स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीही असेल. तसेच, Idle-Stop-Start, टॉर्क असिस्ट, ब्रेक एनर्जी रिजनरेशन सिस्टम आणि गिअरशिफ्ट इंडिकेटर देण्यात आलंय.