नारळाच्या मलाईने करा चेहऱ्याचा मसाज; सौंदर्य खुलण्यास होईल मदत

तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा नक्कीच समावेश करा.

Updated: May 11, 2022, 03:28 PM IST
नारळाच्या मलाईने करा चेहऱ्याचा मसाज; सौंदर्य खुलण्यास होईल मदत title=

मुंबई : नारळाचं पाणी हे केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. उन्हाळ्यात लोकं याचं भरपूर सेवन करतात. नारळाचं पाणी पिण्याव्यतिरिक्त लोक त्वचेवर आणि केसांवर देखील वापरतात. केवळ नारळपाणीच नाही तर त्याची मलाई देखील सौंदर्य वाढवण्याचं काम करतं.

सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी नारळाची मलाई सर्वोत्तम पर्याय असू शकते. या उन्हाळ्यात तुम्हाला निरोगी आणि चमकणारी त्वचा हवी असेल, तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा नक्कीच समावेश करा.

नारळाच्या मलाईचे फायदे

नारळ पाणी आणि मलाई त्वचेला केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही हायड्रेट ठेवतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात. काही आठवडे नारळाच्या मलाईचा वापर केलात तर तुम्हाला आपोआप फरक दिसून येईल.

मलाईने करा मसाज

सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या मलाईने मसाज करा. यासाठी क्रीम मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्याला मसाज करा. मसाज केल्यानंतर, 10 मिनिटं असंच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा फ्रेश दिसण्यास मदत होईल.

त्वचेचा तेलकटपणा होईल दूर

तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी नारळाच्या लाईचाही वापर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे यामुळे डेड स्किनही निघून जाईल. यासाठी एका भांड्यात एक चमचा मलाई घ्या आणि त्यात अर्धा चमचा मुलतानी माती आणि बेसन मिसळा. पेस्ट थोडी पातळ करण्यासाठी तुम्ही थोडे गुलाबजल मिक्स करू शकता. आता ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर 20 मिनिटे राहू द्या. 20 मिनिटांनंतर टॉवेललच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. 

टॅनिंगची समस्या होईल दूर

तुम्ही नारळाच्या मलाईने बर्फाचे तुकडे बनवू शकता. पहिल्यांदा क्रीम चांगलं बारीक करा आणि त्यात एक थेंब कॅरेट सीड एसेंशियल ऑइल मिसळा. जर प्रमाण जास्त असेल तर आवश्यक तेलाचे 2 थेंब घाला. आता बर्फाचे तुकडे असलेल्या ट्रेमध्ये टाकून ते फ्रीजमध्ये ठेवा. याचे तुकडे तयार झाल्यावर चेहऱ्याला मसाज करा.