French Fries चवीने खाल्यामुळे ओढावेल संकट, ५ आजारांची टांगती तलवार

लहान मुलं फ्रेंच फ्राईज चवीने खातात मात्र धोका वाढतो 

Updated: Feb 1, 2022, 01:28 PM IST
French Fries चवीने खाल्यामुळे ओढावेल संकट, ५ आजारांची टांगती तलवार  title=

मुंबई : संपूर्ण जगात बटाट्यापासून बनवलेल्या फ्रेंच फ्राईजच्या प्रेमींची काही कमी नाही. बटाटा हा कायमच सर्वात स्वादिष्ट पदार्थांमध्ये गणला जातो. कधी भाजी आवडली नाही किंवा काही वेगळं खावंस वाटलं तर बटाटा आणि त्याचे फ्रेंच फ्राईज आवडीने खाल्ले जातात. मात्र नियमितपणे बटाटा खाणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. बटाटा तुमच्या शरीरावर कळत नकळत वाईट परिणाम करत असतो. 

फ्रेंच फ्राइजमुळे होणार ५ आजार 

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननुसार, सुमारे 4500 तरुणांवर अभ्यास केला असता धक्कादायक निष्कर्ष समोर आले. असे सांगण्यात आले आहे की जे लोक आठवड्यातून 2 पेक्षा जास्त वेळा फ्रेंच फ्राईज खातात, ते लवकर मरण्याचा धोका दुप्पट होतो.

पोटाचा होणार त्रास 

फ्रेंच फ्राईजचे पचन प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेत खूपच मंद होते कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय जुलाब, उलट्या आणि गॅसची समस्याही उद्भवू शकते.

मेंदूचा त्रास देखील होणार 

फ्रेंच फ्राईज तुमच्या मेंदूसाठी चांगले नाही कारण हायड्रोजनेटेड तेल आणि फ्राईजमध्ये भरपूर ट्रान्स फॅट असते. ज्यामुळे अल्झायमर रोगाचा धोका वाढतो आणि स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या वाढते.

ह्यूमन सिस्टममध्ये होणार बदल 

फ्रेंच फ्राईजचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम होतो. कारण काहीवेळा अशा अन्नातील अस्वास्थ्यकर जीवाणू तुमच्या आतड्याच्या मायक्रोबायोमला नुकसान करतात. यामुळे तुमची रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते.

हृदयाचा होणार त्रास 

फ्रेंच फ्राईज वारंवार खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. जास्त तळलेले अन्न रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि 'ट्रिपल वेसेल्स डिसीज'सारखे गंभीर आजार होतात.

वजन वाढणार 

आजकाल वजन वाढणे ही एक कॉमन समस्या आहे.  फ्रेंच फ्राईज सारख्या जास्त कॅलरी फूडमध्ये कंबर रुंद होते, पोट वाढणे आणि एकूणच लठ्ठपणाची समस्या उद्भवते. या समस्या टाळायच्या असतील तर जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा.