स्त्रियांंमधील मधुमेहाबाबत नवं धक्कादायक संशोधन !

आजकाल खाण्यापिण्यासोबतच झोपण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल झाले आहेत. या बदलांमुळे आपण नकळत अनेक लाईफस्टाईलशी निगडीत समस्यांना आमंत्रण देत आहोत. यापैकी एक म्हणजे मधुमेह. भारताला तर मधुमेहाची राजधानी म्हटलं जाते. 

Updated: Jul 4, 2018, 06:54 PM IST
स्त्रियांंमधील मधुमेहाबाबत नवं धक्कादायक संशोधन !  title=

मुंबई : आजकाल खाण्यापिण्यासोबतच झोपण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल झाले आहेत. या बदलांमुळे आपण नकळत अनेक लाईफस्टाईलशी निगडीत समस्यांना आमंत्रण देत आहोत. यापैकी एक म्हणजे मधुमेह. भारताला तर मधुमेहाची राजधानी म्हटलं जाते. 

मधुमेहाबाबत धक्कादायक वास्तव उघड 

आठवड्याभरामध्ये 45 तासांपेक्षा अधिक काम करणार्‍यांमध्ये मधुमेहाचा धोका 70% अधिक वाढला आहे. तर पुरूषांमध्ये आठवड्याभरात 30-40 तास काम करणार्‍यांमध्ये मधुमेहाचा धोका कमी आहे. कॅनडतील क्यूबैक यूनिवर्सिटी हॉस्पिटल आणि लैवैल यूनिवर्सिटीने केलेल्या अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 

एका रिपोर्टनुसार, 2030 पर्यंत जगभरात 439 मिलियन प्रौढांमध्ये मधुमेह बळावण्याचा धोका आहे. म्हणजेच 2010च्या मधुमेहाच्या रूग्णांपेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. 

कॅनडामधील या संशोधनानुसार, करियरमध्ये गुरफटणर्‍या महिलांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक आहे. महिलांवर करिअरसोबतच घराची, संसाराची जबाबदारी असते. यामुळे त्या रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. म्हणून स्त्रियांवर ताण तणाव अधिक आहे. 

ताण वाढल्यास शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडण्यास कारणीभूत ठरते. यामुळे इन्सुलिनच्या कार्यावरही परिणाम होतो. या संशोधनातून समोर आलेली अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पुरूषांचा काम करण्याचा काळ त्यांच्यातील मधुमेहाच्या समस्येवर फारसा परिणाम करत नाही. 

कसे झाले संशोधन ? 

या संशोधनासाठी 7065 लोकांच्या आरोग्याबाबत रिकोर्ड्स घेतले गेले. यामध्ये 35-74 वर्षीय लोकांचा समावेश करण्यात आला. यामध्ये 12 वर्षांचा हेल्थ रेकॉर्ड विचारात घेण्यात आला. उशिरापर्यंत काम करणार्‍या महिलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण 63% हून अधिक आहे. पुरूषांमध्ये अधिक वयाच्या, अधिक वजन असणार्‍यांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक आहे.