वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत - राहुल गांधी

 मोदी यांच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे.  

ANI | Updated: May 5, 2019, 05:10 PM IST
वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे. आता लढाई संपली आहे, माझ्या वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. तसेच मोदींनी स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केल्याचे प्रियंका गांधी वाड्रा यांनीही मोदींवर निशाणा साधताना म्हटले आहे. 

मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत बोफोर्स घोटाळ्यावर भाष्य केले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करताना नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वडिलांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशी बनवली होती. मात्र, पाहता पाहता भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात त्यांचा जीवनप्रवास संपला, अशी जहरी टीका मोदी यांनी केली.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पतंप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुल यांनी म्हटले आहे, मोदीजी लढाई तर आता संपलेली आहे. आपले कर्म आपली वाट पाहत आहे. स्वतःच्या मनातल्या गोष्टी माझ्या वडिलांवर थोपवणेही आता आपल्याला थांबवू शकणार नाही.

मोदी यांनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. त्याचवेळी प्रियंका गांधी वाड्रा यांनीही मोदींवर निशाणा साधला. मोदी यांनी स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केल्याचे म्हटले आहे. प्रियंका यांनी ट्विट करुन मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एका अनियंत्रित सनकी व्यक्तीने स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.