तरूणाची प्रतिभा पाहून भारावले मोदी; स्वतः फोन करून दिल्या शुभेच्छा

मोदींनी केलं भरभरून कौतुक 

Updated: Jul 27, 2020, 08:28 AM IST
तरूणाची प्रतिभा पाहून भारावले मोदी; स्वतः फोन करून दिल्या शुभेच्छा  title=

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळमध्य राहणाऱ्या सीबीएसई बोर्डचा टॉपर विनायकला फोन करून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी फोन करून तरूणाला विचारलं,'शाब्बास विनायक शाब्बास! जोश कसा आहे?' विनायक एम मल्लिकला देशाच्या पंतप्रधानांनी असा प्रश्न विचारल्यामुळे आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी देखील उत्तर देताना म्हटलं की,'हाय सर'. 

टॉपर आलेल्या विनायकचे वडिल मजूराचं काम करतात. अशा परिस्थितीतही विनायकने १२ वी च्या परीक्षेत वाणिज्य शाखेत टॉप आला आहे. विनायक केरळमध्ये नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी आहे. विनायक, एर्नाकुलम आणि इदुक्की जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या एका गावात राहतो. विनायकला वाणिज्य शाखेत ५०० पैकी ४९३ गुण मिळाले आहेत. त्याला अकाऊंटेंसी आणि बिझनेस स्टडीजमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. 

मोदींनी विनायक आणि आपलं झालेलं बोलणं रविवारी 'मन की बात' मध्ये सांगितलं. मोदींशी संपर्क झालेल्या विनायकने म्हटलं की,'आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे.' चर्चेदरम्यान मोदींनी विनायकला विचारलं की, त्याने आतापर्यंत कोणकोणत्या राज्यांमध्ये प्रवास केलाय. तेव्हा विनायकने फक्त केरळ आणि तामिळनाडू असं सांगितलं. 

'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी विनायकला दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. यावर विनायकने उत्तर दिलं की, पुढच्या परीक्षेकरता तो दिल्लीत प्रवेश घेणार आहे. आताच्या विद्यार्थ्यांना विनायकने सल्ला दिला आहे की, मेहनत आणि वेळेचे सदुपयोग करणं अत्यंत महत्वाचं आहे.