कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून (Koyna dam) आज सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.  

Updated: Jul 29, 2021, 10:21 AM IST
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा title=

सातारा : कोयना धरणातून (Koyna dam) आज सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.(Koyna to increase discharge) 49300 क्युसेक्स पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग केला जाणार आहे. सध्या कोयना धरणातून सुरु आहे. 33 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे . धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. सध्या धरणात 90.46 TMC पाणीसाठा झाला आहे. हा विसर्ग वाढविण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Koyna to increase discharge, downstream villages on alert)

आज 29 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता धरणाची पाणी पातळी 2152 फूट 9  इंच  झाली असून धरणामध्ये 90.46 TMC पाणीसाठा झाला आहे. धरणाची वक्रद्वारे  24 जुलै 2021 पासून 5 फुट 6 इंच वर स्थिर आहेत. सध्या सांडवा आणि पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 33045 क्युसेक्स विसर्ग चालू आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज  धरणाची वक्रद्वारे एकूण 9 फुट उचलून सांडवा आणि पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 49300 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, असे कोयना धरण व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले.