पुण्यातील धक्कादायक प्रकार, रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग

महिला पोलिसाच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

Updated: Mar 24, 2022, 10:07 PM IST
पुण्यातील धक्कादायक प्रकार, रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग title=
प्रतिकात्मक फोटो

पुणे : पुण्यातील भारतमाता चौक भागात एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एका सिग्नलवरुन रिक्षा चलकांनी महिला पोलिस कर्मचारीला जबरदस्ती रिक्षात खेचून नेऊन तिच्यावर विनयभंग केला. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. महिला पोलिसाच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. 

विश्वदीप भरत मादलापुरे (वय-19), अभिषेक बाळासाहेब पोळ (वय-19), सुनिल शिवाजी कसबे (वय-20) असे या आरोपींची नावं आहेत. ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

महिला पोलीस कर्मचाराऱ्याने याबाबत बुधवारी (दि.23) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रिक्षाचालक वेडीवाकडी गाडी चालवत नव्हते, तेव्हा पोलिसांनी या चालकांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबले नाही. त्यावेळी पुढे भारत माता चौकात सिग्नलवर रिक्षा थांबवली असता, या महिल्या कर्मचारीने त्यांना थांबले आणि रिक्षा व्यवस्थीत चालण्याची ताकीद दिली. परंतु यावेळी महिला पोलिसासोबत  गैरवर्तन करुन या रिक्षा चालकांनी तिला जबरदस्ती रिक्षात ओढले आणि तिचा विनयभंग केला.

ज्यानंतर या महिला पोलिस कर्मचारीने याबाबत गुन्हा दाखल केला, ज्यानंतर सरकारी कामात अडथळा आणून विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करत आहेत.