पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये श्रेयाचं राजकारण

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं विकास कमांच्या श्रेयाचं राजकारण तापू लागलंय. असाच प्रकार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय.

Updated: Dec 7, 2011, 10:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं विकास कमांच्या श्रेयाचं राजकारण तापू लागलंय. असाच प्रकार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय.

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना जोडणारा पिंपळे निलख आणि बाणेरमधल्या उड्डणपुलासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं ९० टक्के खर्च केलाय. तर १० टक्के खर्च पुणे महापालिकेनं केलाय. असं असतानाही पुण्यातले राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी पुलाच्या उद्घाटनाचा घाट घातला आणि तसे फलक बाणेर परिसरात लागले. हे समजताच पिंपरी चिंचवडमधले काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

 

 

काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महापौरही जागे झाले आणि त्यांनीही चांदेरे यांनी केलेला प्रकार चुकीचा असल्याचं सांगितलं. या प्रकरणावर आता चांदेरेही काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र जसजशी महापालिकेची निवडणूक जवळ येईल तशी श्रेयवादाची ही लढाई अधिक तीव्र होणार आहे.