उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.

Updated: May 2, 2016, 06:29 PM IST
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार title=

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.

राहुल किंवा प्रियंका मुख्यमंत्री पदासाठी तयार न झाल्यास एखादा ब्राह्मण चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणावा असं त्यांचं मत आहे.

जर राहुल गांधींना २०१९ मध्ये जर विजय मिळवायचा असेल तर त्यांना आधी विश्वास निर्माण केला पाहिजे की ते पक्षाला विजय मिळवून देऊ शकतात. असं देखील प्रशांत यांचं म्हणणं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये २०१७ ला विधानसभा निवडणूक होणार आहे. यावर बसपाच्या अध्यक्षा मायावती म्हणतात की, काँग्रेसने कोणालाही सीएम उमेदवार घोषित केलं तरी विजय बसपा पक्षाचाच होणार.