आमिरला अश्रू आवरणं झालं कठिण!

बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच त्याचा टिव्ही शो 'सत्यमेव जयते-3' घेऊन परत येत आहे.

Updated: Aug 28, 2014, 09:06 PM IST
आमिरला अश्रू आवरणं झालं कठिण!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच त्याचा टिव्ही शो 'सत्यमेव जयते-3' घेऊन परत येत आहे. आमिर खानने पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, 'या वेळेस सत्यमेव जयतेच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. तो आता या शो दरम्यान लाईव्ह चॅटदेखील करणार आहे.

कार्यक्रमानंतर एका तासाच्या दरम्यान देशातील विविध शहरातल्या लोकांशी लाईव्ह चर्चा करणार आहे.

सामान्य लोक फेसबुक आणि मोबाईलच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले जाऊ शकतील. लोकांच्या प्रश्नांची उत्तरही या कार्यक्रमादरम्यान आमिर देण्याचा प्रयत्न करणार आहे.  

'सत्यमेव जयते' सीजन-3 च्या घोषनेच्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना अमिर खान सामाजिक मुद्यांवर बोलत असताना अचानक भावूक झाला... यावेळी त्याला त्याचे अश्रूही आवरणं कठिण झालं. 

'गेल्या तीन वर्षात जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय... चटकन कुणालाही चुकीचं ठरवणं योग्य नाही' असंही यावेळी आमिरनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.