...अशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया!

चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांकडून अधिक फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार, असल्याचा इशारा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुण्यात दिलीय. पुण्यातल्या दोन कॉलेजेसना तशी नोटीस बजावल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिलीय. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती देण्याकरता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.  

Updated: Jun 9, 2015, 01:14 PM IST
...अशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया! title=

पुणे : चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांकडून अधिक फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार, असल्याचा इशारा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुण्यात दिलीय. पुण्यातल्या दोन कॉलेजेसना तशी नोटीस बजावल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिलीय. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती देण्याकरता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.  

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असेल पाहुयात...

  • 11 जून ते 18 जूनपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार

  • 24 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

  • 25 - 27 जून दरम्यान पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणार

  • 2 जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणार

  • 2 - 4 जुलैपर्यंत दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार

  • 9 जुलैला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार

  • 9, 10 जुलैला तिसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणार

  • प्रवेश न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांना 14 जुलैपर्यंत प्रवेश घेण्याची मुभा

  • 15 जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरु होणार

दरम्यान, मुंबईत अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत किती जागा शिल्लक आहेत त्यावर एक नजर टाकूयात...

मुंबई - अकरावी प्रवेश 2015-16
शाखा अंतर्गत कोटा अल्पसंख्यांक कोटा व्यवस्थापन कोटा
आर्टस 5125 8437 1952
सायन्स 11824 21037 4293
कॉमर्स 21686 43544 8193

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.