मुंबईला कोणाचे पूज्य पिताश्री तोडू शकत नाही - मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रापासून मुंबईला कोणाचेही पूज्य पिताश्री तोडू शकणार नाहीत. मुंबई कालही महाराष्ट्रात होती. आजही आहे आणि यापुढेही ती महाराष्ट्रातच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

Updated: Dec 16, 2014, 07:08 PM IST
मुंबईला कोणाचे पूज्य पिताश्री तोडू शकत नाही - मुख्यमंत्री फडणवीस title=

मुंबई : महाराष्ट्रापासून मुंबईला कोणाचेही पूज्य पिताश्री तोडू शकणार नाहीत. मुंबई कालही महाराष्ट्रात होती. आजही आहे आणि यापुढेही ती महाराष्ट्रातच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

कोणत्याही परिस्थितीत मुंबई वेगळी होणार नाही. मुंबईला कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईचा विकास करताना कोणी राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केले. 

मुंबईच्या विकासाचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या मागणीचे कोणी उगाचच राजकारण करू नये. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा कांगावा करण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी सांगत शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.

मुंबईचा विकास व्हावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. या भावनेतूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत मी पंतप्रधानांना कळवले की मुंबईचा विकास साधताना त्यास 'फास्ट ट्रॅक' मंजुरी मिळावी. मुंबई शहराच्या विकासाशी निगडित असलेले बहुतांश प्रकल्प केंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे असे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्राचा निधी आणि मंजुरीही आवश्‍यक असते. त्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे. मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए या संस्थांना कोणताही धोका पोचणार नाही. त्यांच्यावर अविश्‍वास दाखवण्याचा प्रश्‍नच येत नाही. मुंबई तोडण्याचा डाव असल्याबाबतचे चुकीचे वृत्त पसरविले जात आहे ते चुकीचे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.