मांजरीमुळे गेला ६ महिन्याच्या चिमुरडीचा जीव

मांजरीमुळं एका ६ महिन्याच्या चिमुरडीचा जीव गेला असं सांगितलं तर खरं वाटणार नाही. कारण अशी घटना केवळ बॉलिवूड किवा हॉलिवूडच्या थरार नाट्यातच घडू शकते. मात्र अशी थरारक घटना 

Updated: Mar 24, 2015, 11:11 PM IST
मांजरीमुळे गेला ६ महिन्याच्या चिमुरडीचा जीव title=

नागपूर: मांजरीमुळं एका ६ महिन्याच्या चिमुरडीचा जीव गेला असं सांगितलं तर खरं वाटणार नाही. कारण अशी घटना केवळ बॉलिवूड किवा हॉलिवूडच्या थरार नाट्यातच घडू शकते. मात्र अशी थरारक घटना 

नागपुरात घडलीय. यात लावण्य कुडे नावाच्या ६ महिन्याच्या चिमुरडीचा जीव गेलाय.  

६ महिन्याची लावण्य घरातील स्वयंपाक घरात खेळत होती. बाजूलाच तिची आई स्वयंपाक करत होती. नेहमी प्रमाणे सर्व काही सुरळीतपणे सुरू असतानाच, घरातील माळ्यावर एका मांजरीनं उडी मारली. तिच्या धक्क्यानं सुमारे तीन किलो वजनाचा हा पितळीचा गुंड खाली खेळत असलेल्या लावण्याच्या डोक्यावर पडला. 

अचानक घडलेल्या या घटनेमुळं आधीच भांबावलेल्या तिच्या वडिलानं प्रदीपनं लगेच धीर न सोडता लावण्यला खाजगी रुग्णालयात नेलं. पण खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला शासकीय रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. धावपळ करत प्रदीपनं आपल्या ६ महिन्याच्या चिमुरडीला शासकीय रुग्णालयात भरती केलं. पण तोपर्यंत चांगलाच उशिर झाला होता आणि या अपघातात लावण्यचा मृत्यू झाला. 

प्रदीप कुडे यांच्या कुटुंबानं मांजर पाळलं नसलं तरीही त्यांच्या घरी नेहमीच मांजर येत असे. त्यामुळं त्यांच्याकरता मांजरीचं घरी येणं काही नवीन नव्हतं. लहान मुलं असतील तर पाळीव किंवा घरात येणाऱ्या अशा प्राण्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवायला हवं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.