फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार - राज ठाकरे

आज महापौरांवर बॅडमिंटन खेळताना हात साफ करूण घेतला, पुढे फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 18, 2016, 04:00 PM IST
फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार - राज ठाकरे title=

पुणे : आज महापौरांवर बॅडमिंटन खेळताना हात साफ करूण घेतला, पुढे फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार आहे, असं राज ठाकरे यांनी पुण्यात म्हटलं आहे.

क्रीडा संकूल सारख्या सुविधा निर्माण व्हायला पाहिजे, त्या कायमस्वरुपी उत्तम स्थितित राहतील याची काळजी घ्या, या सुविधा महापालिकेच्या नसून आमच्या आहेत ही गोष्ट नागरिकांनी लक्षात घ्यावी, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

पुण्यातील बिबवेबाडी मध्ये उभारण्यात आलेल्या कै. शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रिडा संकुलाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. मनसे नगरसेविका अस्मिता शिंदे यांच्या प्रयत्नातून हे क्रिडा संकुल उभारण्यात आलंय. 

या उद्घाटन समारंभाच्या वेळी राज ठाकरे यांनी बॅडमिंटन कोर्टवर रॅकेट हातात, घेऊन आपल्या खेळाची झलक दाखवली. कोर्टवर विरुद्ध बाजूला पुण्याचे महापौर प्रशांत जगताप होते. त्यांना मात्र राज यांनी मारलेला हा फटका परतवता आला नाही. अर्थात बॅडमिंटन कोर्टवरील हा खेळ लवकरच महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे.