पुण्यात खरंच काय उणे, चक्क PMPLची बस चोरीला

पुण्यात चक्क पीएमपीएमएलची बस चोरीला गेली होती. विश्वास बसत नाही ना... पण हे वास्तव आहे. मार्केट यार्ड परीसरात गेट नं 9 इथं उभी असलेली बस अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. 

Updated: Mar 19, 2015, 10:22 AM IST
पुण्यात खरंच काय उणे, चक्क PMPLची बस चोरीला title=

पुणे: पुण्यात चक्क पीएमपीएमएलची बस चोरीला गेली होती. विश्वास बसत नाही ना... पण हे वास्तव आहे. मार्केट यार्ड परीसरात गेट नं 9 इथं उभी असलेली बस अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. 

चोरीला गेलेली ही बस नाशिक जिल्ह्यात शिंदे गावात  सापडलीये. विशेष म्हणजे बस चोरीला जात असताना रखवालदाराला हा प्रकार लक्षात आला. त्यानं दुसरी बस घेऊन चोराचा पाठलाग केला. मात्र चोर बससह पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. तपासानंतर ही बस नाशिकमध्ये सापडली मात्र चोर अजून पोलिसांच्या हाती लागला नाही. 

पुण्यात पीएमपीएमएलची बस चोरीला जाण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.  शहर परिवहन सेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.