रायगड किल्ल्याच्या पायथ्याचा 'हिरकणी' खचला

निसर्गाचा दुसरा रुद्रावतार रायगडमध्ये पाहायला मिळाला. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडीमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. रस्ताही खचलाय. याचा 40 घरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

Updated: Aug 1, 2014, 10:46 AM IST
रायगड किल्ल्याच्या पायथ्याचा 'हिरकणी' खचला title=

अलिबाग : निसर्गाचा दुसरा रुद्रावतार रायगडमध्ये पाहायला मिळाला. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडीमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. रस्ताही खचलाय. याचा 40 घरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. त्यातच आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीमध्ये रस्ता आणि जमिनीला भेगा पडल्या आहेत. 50, 60 मीटर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 

महसूल प्रशासनाने या दुर्घटनेची दखल घेत या प्रकाराची पाहणी केलीय. हिरकणी वाडीवर 40 ते 50 घरांची वस्ती आहे. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या रोपवेला लागून ही हिरकणी वाडी आहे. वस्तीच्या शेजारचा शेतीचा 500 मीटरचा भाग या भेगांच्या संभाव्य धोका क्षेत्रात येतोय. या शेतातही मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे हा संपूर्ण भाग कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. 

2005 मध्ये अतिवृष्टीमुळे दासगाव, जुई, रोहन, कोंडीवते या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे 215 जणांचा मृत्यू झाला होता. रायगड किल्ल्यावरून येत असलेल्या भल्यामोठ्या धबधब्यातील पाणी या भेगांखालून जात असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथे भूस्खलनाचा धोका आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.