अमित शाह आज मुंबईत

भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा राज्यातला तीन दिवसांचा दौरा दोन दिवसांचा करण्यात आलाय. ते आज मुंबईत दाखल होणार आहेत. 

Updated: Sep 17, 2014, 06:09 PM IST
अमित शाह आज मुंबईत title=

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा राज्यातला तीन दिवसांचा दौरा दोन दिवसांचा करण्यात आलाय. ते आज मुंबईत दाखल होणार आहेत. 

20 आणि 21 सप्टेंबर रोजी भाजपची केंद्रीय संसदीय समितीची दिल्लीमध्ये बैठक आहे. बैठकीत एका दिवशी हरियाणा आणि एका महाराष्ट्रासंदर्भात चर्चा होणार आहे.

या बैठकीमध्ये राज्य भाजपनं सांगितलेले बहुतेक सर्व उमेदवार निश्चित होऊन यादी जाहीर करण्यात येणार आहे.  जातीय समीकरणं लक्षात घेता काही उमेदवारांची नावं नंतर जाहीर होणार आहेत. 19 सप्टेंबरपर्यंत जागा वाटपाची प्रक्रिया कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणार असल्याचं भाजप नेते विनोद तावडेंनी म्हटलंय. बीड लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारही त्याचवेळेस जाहीर होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या निवास्थानी राज्यातल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं आज पुन्हा भाजप नेत्यांची मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

सामनाच्या पहिल्या पानावर ‘भाजपची पीछेहाट’


दै. सामना

शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले गेले असतांनाच पोटनिवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याच्या वृत्ताला शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त पहिल्या पानावर प्रमुख स्थान देण्यात आलं आहे. सामनाच्या पोटनिवडणुकांच्या निकालावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात अग्रलेखाव्दारे भाष्य करण्यात आलंय. महाराष्ट्राच्या निकालासाठी हा धडा आहे, असं सांगत सामनानं भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.