कोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, June 9, 2013 - 10:22

www.24taas.com, झी मीडिया,रत्नागिरी
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
केरळ किनारपट्टीवर एक जूनला दाखल झालेला मान्सून आठ दिवस प्रवास करून महाराष्ट्रात दाखल झालाय. पुणे आणि महाराष्ट्रीतील काही भागात पाऊस पडला. शनिवारपासून कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यात पाच वर्षांनंतर प्रथमच मॉन्सूनने मृग नक्षत्राचा मुहूर्त गाठला आहे.
राज्यात चार दिवसांपासून दक्षिण कोकणात मुक्काम ठोकलेला मान्सून आपल्या शहरात कधी येतो, याची उत्सुकता पुणे आणि मुंबईकरांना होती. अखेर राज्यातील या दोन प्रमुख शहरांमध्ये मान्सून दाखल झालाय. मुंबईतील कुलाबा, सांताक्रूझ येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले. तर ठाण्यात आणि नवीमुंबईत पाऊस कोसळला. याचा परिणाम रेल्वे लोकलवर झाला.

अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीपासून लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसासह वादळ सुरू आहे. वादळाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरील आंबोली घाट धोकादायक झाला आहे. त्यामुळे वाहने सवकाश हाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीत शनिवारी सकाळपर्यंतच्या जोरदार पाऊस कोसळत होता. रात्री आणि सकाळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यापावाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सक्रिय होता. नवीमुंबई येथे १३८ आणि रत्नागिरी येथे १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर रायगड जिल्ह्यात पाऊस कोसळत आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 9, 2013 - 10:22
comments powered by Disqus