क्रिकेट : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पुरुष - महिला टीमचा आज सामना

भारताच्या पुरूष आणि महिला संघांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यांची आज सांगता होतेय. दोन्ही संघ विजयासह दौरा संपवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पुरूष संघाचा तिसरा आणि अंतिम टी-20 सामना रंगणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2018, 07:43 AM IST
क्रिकेट : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पुरुष - महिला टीमचा आज सामना   title=

नवी दिल्ली : भारताच्या पुरूष आणि महिला संघांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यांची आज सांगता होतेय. दोन्ही संघ विजयासह दौरा संपवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पुरूष संघाचा तिसरा आणि अंतिम टी-20 सामना रंगणार आहे.

 न्यूलँडमध्ये  पहिलाच सामना

मालिकेमध्ये 1-1 बरोबरी असल्यामुळे या सामन्याची रंगत वाढली आहे. मात्र न्यूलँडच्या मैदानामध्ये भारताचा हा पहिलाच सामना असल्यामुळे विराट सेनेला खेळपट्टीचा अंदाज नाही. याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला मिळू शकतो असं मानलं जातंय.

क्रिकेट रसिकांना उत्कंठा

कसोटी मालिकेतला पराभव आणि एकदिवसीय मालिकेतल्या निर्विवाद विजयानंतर टी-20 मालिकेचं काय होतं, याची उत्कंठा क्रिकेट रसिकांना आहे.

महिला क्रिकेट सामना

T20I match abandoned due to rain, India Women take unassailable 2-1 lead against South Africa Women

दुसरीकडे महिला संघानं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतलीये. एक सामना पावसामुळे वाया गेलाय.

विजयाची संधी अधिक

आजच्या सामन्यात मालिका बरोबरीत सोडवण्याची दक्षिण आफ्रिकेला संधी असली तरी सध्याचा फॉर्म बघता हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखालील संघाला विजयाची संधी अधिक असल्याचं मानलं जातंय.