सोने

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले

सोन्याचे भाव कमी होत आहेत असा समज असतांना सोन्याचे भाव ऐन लग्नसराईत वधारले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८ हजारांच्या घरात गेला आहे. 

Jan 20, 2015, 06:30 PM IST

पुण्यातील भंगार गोळा करणारा 'श्रीमंत'

घरोघरी जाऊन भंगार गोळा करणाराच पुण्यात श्रीमंत निघाला. त्याला भंगारात मिळालेले चक्क एक किलो सोने या भंगार गोळा करणाऱ्या व्यावसायिकांने परत केले. तेही पदरचे १५० रुपये खर्च करून.

Jan 15, 2015, 05:10 PM IST

तीन दिवसांची तेजी संपली, सोना-चांदी दरात घट

जागतीक बाजारात सध्याच्या उच्च स्तरावर मागणी कमकुवत पडल्यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्यात तीन दिवसातील तेजी संपली आणि भाव १८० रुपयांनी कमी होऊन २७२०० प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर औद्योगिक मागणी आणि शिक्के निर्मात्यांची उचल कमी केल्याने चांदीचे भाव ११५० रुपयांनी कमी झाले त्यामुळे चांदी प्रति किलोला ३७०५० पर्यंत खाली गेली. 

Dec 16, 2014, 07:29 PM IST

आयात नियंत्रणात सूट दिल्याने सोन्याच्या दरात घट

सोनेच्या आयातीवरील नियंत्रणात सूट दिल्यानंतर सोन्याचे भावात सतत घट होत आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोने २६२०० रुपये कमी झाले. ही किंमत २५००० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत काल सोने २६ हजार १५० रुपये होते ते आज २५ हजार ७३० पर्यंत खाली आहे. 

Dec 1, 2014, 08:20 PM IST

सलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण

मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.

Nov 30, 2014, 10:33 AM IST

सोन्याचे भाव गडगडले... आणखी स्वस्त होणार!

सर्वांसाठीच एक गुडन्यूज आहे... सोनं आता अजून स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. रिझर्व्ह बँकेनं सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथील केल्यानं आता सोन्याच्या किंमती आणखी घटण्याची शक्यता आहे. 

Nov 29, 2014, 12:08 PM IST

आता रोज करा सोने खरेदी.. सोन्याचा भाव आणखी घसरला...

सोन्याचा भाव दिवसेंदिवस कमी होत चाललाय. सतत बाराव्या दिवशी देखील सोन्याचा गेलेला दिसतोय.

Nov 15, 2014, 11:44 AM IST

आनंदाची बातमी: सोनं-चांदी आणखी स्वस्त

डॉलरच्या मजबुतीनं मौल्यवान धातूंची मागणी कमजोर झाल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा भाव अनेक वर्षांनी नीचांकी पातळीवर गेला. सोन्याचा भाव २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदी ३४,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.

Nov 9, 2014, 04:35 PM IST

भारतीयांकडे २० हजार टन सोने

 सोने आणि दागिन्यांचा मोह भारतीय नागरिकांना पुरातन काळापासून आहे. एका जागतिक सर्वेक्षणानुसार सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात सध्या २० हजार टन सोन्याचा साठा आहे. त्याची किंमत ५,५२० अब्ज रुपये इतकी आहे.

Oct 24, 2014, 09:49 AM IST

दिवाळीत सोने-चांदी दरात घट

जागतिक बाजारातील नरमाई, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून असलेल्या मागणीतील घट, तसेच औद्योगिक क्षेत्राने खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मंदीची चाल दिसून आली. सोने ७५ रुपयांनी उतरून २७,८५० रुपये तोळा, तर चांदी १०० रुपयांनी उतरून ३८,९०० रुपये किलो झाली. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव  २७६४० रुपये प्रति तोळा तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५,८४३ रुपये आहे.  

Oct 23, 2014, 08:35 AM IST

चक्क सोने तस्करीला लगाम

सोन्याला जास्तच भाव आल्याने तस्करीमध्ये वाढ झाली होती. याला आता लगाम बसणार आहे. कस्टम विभागाने तस्करी रोखण्यासाठी बारीक नजर ठेवली आहे. त्यातच तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळ्यांना जास्त लाभ होत नसल्याने त्यांचीही पाठ फिरु लागली आहे. 

Oct 22, 2014, 11:13 AM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त

नवी दिल्लीः जागतिक स्तरावर सोन्याच्या भावात  0.16 टक्क्याने घट झाली आहे. सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 26 हजार 678 रूपयांनी घसरला आहे.

संपूर्ण देशात दिवाळीच्या तोंडावर सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे सराफांच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. ग्राहकांचा कल सोन्याची नाणी आणि इतर दागिने खरेदी करण्याकडे दिसून येतोय.

Oct 7, 2014, 05:48 PM IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी सोनं लुटलं!

 

मुंबईः ‘विजयादशमी’ हा साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची सराफच्या दुकानात झुंबड उडाली होती. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात कमालीची घट झालेली दिसून येते. तोळ्यामागे सोन्याचा दर 27 हजारांच्या जवळपास आहे. तर चांदी 40 हजारच्या खाली आल्यामुळे दागिन्याची देखील मागणी वाढली आहे.

 

Oct 4, 2014, 07:56 PM IST