Election results 2019: राज्यात काँग्रेसने एकमेव जागा जिंकत लाज राखली, चंद्रपुरात धानोरकर विजयी
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपने तत्कालिन मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी दिली होती.
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. तर देशभरात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. राज्यामध्ये काँग्रेसला फक्त १ जागा जिंकता आली आहे. चंद्रपुरातून काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा जवळपास ५५ हजार मतांनी पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्यमंत्री होते. राज्यातून केंद्रातल्या मंत्र्याचा हा दुसरा पराभव आहे. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपने तत्कालिन मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी दिली होती. हंसराज अहिर यांच्यासमोर काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांचं आव्हान होतं. वंचित बहुजन आघाडीने राजेंद्र महाडोळे चंद्रपूरमधून उमेदवार होते.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र भाजपला विदर्भात तशी कामगिरी करता आली नाही.
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा २,३६,२६९ मतांनी पराभव केला होता.
२०१४ निवडणुकींची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
हंसराज अहिर | भाजप | ५,०८,०४९ |
संजय देवतळे | काँग्रेस | २,७१,७८० |
वामनराव चटप | आप | २,०४,४१३ |
हंसराज कुंभारे | बसपा | ४९,२२९ |
प्रमोद सोरटे | अपक्ष | १०,९३० |
२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.