पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपाच्या गिरीश बापट यांनाच आपली पसंती दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्याचा फायदाही बापटांना झाला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवून युतीला शह देण्याचा प्रयत्न केला. पण राज्याभरात एखाद दुसरा अपवाद वगळता तो यशस्वी झाला नाही. पुण्यातली लढतही सुरूवातीपासून गिरीश बापटांच्या बाजुनेच झाली. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी देखील एकत्र निवडणूक लढवली होती त्यामुळे पुण्यातून भाजपाच्या गिरीश बापट यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली होती. बापट यांच्या विरोधात काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी,वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांच्यात अटीतटीची लढत आहे.
दुपारी 12- दुपारी 1 पर्यंत गिरीश बापट 61 हजार 067 मतांनी आघाडीवर
8.59pm- गिरीश बापट 15 हजार मतांनी आघाडीवर
8.54-गिरीश बापट आघाडीवर
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
अनिल शिरोळे | भाजप | 569825 |
विश्वजीत कदम | काँग्रेस | 254056 |
दिपक पायगुडे | मनसे | 93502 |
सुभाष वारे | आप | 28657 |
इम्तियाज पिरजादे | बसपा | 14727 |
२०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता.