जालना : राज्यात भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत जालना मतदारसंघातून भाजपनं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने विलास औताडे यांना तिकीट दिलं होतं. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. शरदचंद्र वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात होते.
जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत.
२०१४ साली जालन्याच्या मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे विजयी झाले होते. रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा २,०६,७९८ मतांनी पराभव केला होता.