Election Result 2019: रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी, गितेंना धक्का

रायगड या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस दिसत होती.

सुरेंद्र गांगण | Updated: May 23, 2019, 03:13 PM IST
Election Result 2019: रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी, गितेंना धक्का title=

मुंबई : कोकणातील रायगड या मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे. विद्यमान खासदार अनंत तटकरे यांना जोरदार धक्का तटकरे यांनी दिला आहे. गिते हे विद्यमान केंद्रीय उद्योगमंत्री होते. मागील निवडणुकीत गिते हे कमी फरकाने विजयी झाले होते. त्याचा वचपा राष्ट्रवादीने यावेळी भरुन काढला. कोकणात शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात खेचून आणली आहे. लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात जोरदार लढत झाली. यात तटकरे यांनी बाजी मारली. १४ हजार ८१८  एवढ्या मतांनी शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली.

 राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मुंबईत तटकरेंच्या उमेदवारीची घोषणा केली. याआधी तटकरे यांना मावळ मतदारसंघातून सेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता होती . मात्र स्वतः तटकरे यांनीच मावळ ऐवजी रायगड मतदारसंघाची मागणी केली. त्यांनी ही जागा जिंकली आहे. मात्र, मावळची जागा राष्ट्रवादीने गमावलेली आहे. रायगडात कामगार पक्ष (शेकाप) तटकरे यांना  पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचाही विजयात वाटा आहे. दरम्यान, शिवसेनेचे अनंत गिते यांना त्यांचा मतदार संघात कमी झालेला संपर्क हा पराभवाला कारणीभूत ठरला आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता विजय झाला होता. त्यामुळे त्यांनी आधीपासून तशी खबरदारी घेतलेली नाही. तसेच शिसेनेतील अंतर्गत कलह त्यांना अडचणीचा ठरला. याचा परिणाम हा पराभवात झाल्याची चर्चा सुरु आहे.

Election Result 2019: रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी, गितेंना धक्का

अपडेट :

2 वाजता - शिसेनेचे उमेदवार अनंत गिते यांनी पुन्हा आघाडी घेतली असून त्यांना ५, २६४ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे पिछाडीवर गेलेत. येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार चुरस दिसत आहे.

१ वाजता - १४ व्या फेरीअखेर सुनील तटकरे  १०४३ आघाडीवर । अनंत गिते यांच्यासाठी ही निवडणूक कठिण

१२ वाजता - शिवसेनेचे अनंत गीते ८ हजार ८५६ मतांनी आघाडीवर

११ वाजता - नवव्या फेरीअखेर अनंत गीते आघाडीवर 1200 मतांची आघाडी

- आठव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर । शिवसेनेचे अनंद गिते हे पिछाडीवर

- रायगड लोकसभा चौथी फेरी अधिकृत आकडेवारी

अनंत गीते 70 हजार 551

सुनील तटकरे 75 हजार 710

सुनील तटकरे आघाडी :  5 हजार 159

- राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडी : 2 हजार 437 मतांनी आघाडीवर

- पहिली फेरी अधिकृत अनंत गीते 18 हजार 216,  सुनील तटकरे 20 हजार 553

- पाचव्या फेरीअखेर सुनील तटकरे आघाडीवर 5 हजार 23 मतांची आघाडी । शिवसेनेचे अनंत गिते हे पिछाडीवर  

- सुनील तटकरे चौथ्या फेरीअखेर आघाडीवर

सुनील तटकरे यांनी पुन्हा घेतली आघाडी

- रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे पिछाडीवर । शिवसेनेचे अनंत गिते यांनी घेतली आघाडी

- रायगड : अलिबागच्या जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी | केंद्रीय मंत्री, शिवसेना उमेदवार अनंत गीते यांनी घेतलं काळंबादेवीचे दर्शन | अलिबागच्या ग्रामदेवतेला विजयासाठी साकडे | दर्शनानंतर मतमोजणी केंद्राकडे रवाना

रायगड 

रायगड : या मतदारसंघात कुणबी मतांचा प्रभाव आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गिते यांना ४ लाख १३ हजार ५४६ मते, तर ए. आर अंतुले यांना २ लाख ६७ हजार २५ मते मिळाली होती. प्रविण ठाकूर हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना ३९ हजार मते मिळाली होती. 

२०१४ चा निकाल

२०१४ ला मोदी लाट होती. तरीही अवघ्या २ हजार मतांनी अनंत गिते यांचा विजय झाला होता. शिवसेनेच्या अनंत गिते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते, राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ६८ मते, तर शेकापचे रमेश कदम यांना १ लाख २९ हजार मतं मिळाली होती. गिते आणि तटकरे यांच्यात कांटे की टक्कर झाली होती.