मुंबई : ठाणे मतदार संघातून राजन विचारे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत शिवसेनेचा गड राखला आहे. राजन विचारे यांनी १ लाख ९१ हजार ९६३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. राजन विचारे हे १६ व्या लोकसभेचे निवडून गेले होते. राजन विचारे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजीव नाईक यांचा २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. मात्र, त्याचा प्रभाव फारसा पडला नाही. परांजपे यांनी बऱ्यापैकी टक्कर दिली. मात्र, एक दोन फेऱ्यात आघाडी वगळता राजन विचारे यांनी सुरुवातीपासून चांगली आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, राजन विचारे यांच्या उमेदवारीवर काहींची नाराजी होती. तर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात अक्षीशित उमेदवार असा प्रचार केला होता. तसेच छुपे पोष्टरबाजीही करण्यात आली होती. असे असले तरी ही निवडणूक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे शिवसेना नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह महायुतीचे हजारो कार्यकर्त्यांनी जास्तीची मेहनत घेतली.
ठाणे : या मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात लढत होणार आहे. राजन विचारे यांनी महापौर, आमदार, खासदार असा प्रवास केला आहे. शिवसेनेत असताना आनंद परांजपे ठाणे आणि कल्याणचे खासदार होते. २०१४ च्या निवडणुकीत ठाण्यातून राष्ट्रवादीचे संजीव नाईक रिंगणात होते. राजन विचारे यांनी त्यांचा पराभव केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत सेनेच्या गोटातून विजयी झालेले आनंद परांजपे यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीने ठाण्यातून उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने ठाण्यातून मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी दिली आहे. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
२०१४ च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक ठाण्यातून विजयी झाले होते.