बारामती : बारामती मतदार संघात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा विजयी झाल्या आहेत. 1 लाख 54 हजार मतांनी त्यांनी भाजपाच्या कांचन कूल यांचा पराभव केला. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात येथे सक्षम उमेदवार नव्हता. गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. म्हणून राष्ट्रवादीकडून पुन्हा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली होती. सकाळपासून बारामतीतील मतदानाचे कल हे सुप्रिया सुळे यांच्या बाजुनेच येत होते. प्रत्येक टप्प्यातील मतदान मोजणीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने कांचन यांच्यावर वर्चस्व राखले आणि सुप्रिया सुळे यांचा बारामतीतून एकहाती विजय झाला आहे.
दुपारी 2.00- बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी
दु.1.00- दुपारी 1 वाजेपर्यंत सुप्रिया सुळे 1 लाख 12 हजार 369 मतांनी आघाडीव
12.00मि-दुपारी 12 वाजेपर्यंत सुप्रिया सुळे 79 हजार 716 मतांनी आघाडीवर
11.35 मि- 11 व्या फेरीत सुप्रिया सुळे यांना 10 हजार 463 मतांची आघाडी. सुप्रिया सुळे यांची आघाडी 61 हजार 788 मतांवर.
10.43 मि-सुप्रिया सुळे यांना सातव्या फेरीत फक्त 903 मतांची आघाडी. सातव्या फेरी अखेर सुप्रिया सुळे 25361 मतांची आघाडी.
1o.30 मि.- 6 व्या फेरी अखेर सुप्रिया सुळे 24500 मतांनी आघाडीवर.पाचव्या फेरी अखेर सुप्रिया सुळे यांना एकुण 1लाख 52 हजार मते. तर कांचन कुल यांना 1 लाख 34 हजार मते.
10.07 मि- बारामतीत सुप्रिया सुऴे 18 हजार 543 मतांनी आघाडीवर
9.50 मि- सुप्रिया सुऴे 6 हजार 486 मतांनी आघाडीवर
9.28 मि- सुप्रिया सुऴे 4 हजार मतांनी आघाडीवर
9.16 मि.- सुप्रिया सुऴे 8 हजार मतांनी मागे
बारामती दुसरी फेरी अखेर सुप्रिया सुळे यांना 418 मतांचा लीड.
बारामती, इंदापूरमध्ये, भोरमध्ये सुप्रिया सुळेंची आघाडी, तर दौंड, खडकवासला आणि पुरंदरमध्ये कांचन राहूल कूल आघाडीवर
सुप्रिया सुळे पहील्या फेरीत आघाडीवर.सुप्रिया सुळे यांना पहील्या फेरीत 1894 मतांची आघाडी. सुळे पहीली फेरी - 29053 मते . भाजपच्या कांचन कुल यांना 27159 मते.
कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे दौंडचे आमदार आहेत. याच मतदारसंघात सुप्रिया सुळे २०१४ च्या निवडणुकीत २५ हजार मतांनी पिछाडीवर होत्या. कांचन कुल यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना आणखी कांटे की टक्कर मिळणार आहे.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी | 521562 |
महादेव जानकर | राष्ट्रीय समाज पक्ष | 451843 |
दिपक पायगुडे | आप | 26396 |
विनायक चौधरी | बसपा | 24908 |
- | नोटा | 14216 |
२०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा पराभव केला होता. पण महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कांटे की टक्कर दिली होती. २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 80 हजार मतांनी पराभव केला होता.