अहमदनगर : नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीने डॉ. सुजय विखे यांच्यासाठी जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर भारतीय जनता पक्षाने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती. नगरमध्ये या २ युवा नेत्यांमध्ये चांगलाच सामना रंगला होता. संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड मैदानात होते. मात्र भाजमध्ये प्रवेश करणारे सुजय विखे पाटील यांचा अखेर अहमदनगर मतदारसंघातून विजय झाला आहे.
1:08 PM- अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील 1 लाख 45 हजार मतांसह आघाडीवर.
9:53 AM- अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील 20 हजार 371 मतांनी आघाडीवर
अहमदनगरमध्ये सुजय विखे पिछाडीवर
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव रावळे यांचा २ लाख ९ हजार १२२ मताधिक्यांनी पराभव केला.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
दिलीपकुमार गांधी | भाजप | 605185 |
राजीव राजाळे | राष्ट्रवादी | 396063 |
बबन कोळसेपाटील | अपक्ष | 12683 |
किसन काकडे | बसपा | 8386 |
नोटा | नोटा | 7473 |